Sunday, May 26, 2024
Homeनगरनेवासा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचार्‍यांच्या बदल्या

नेवासा पोलीस ठाण्यातील 6 कर्मचार्‍यांच्या बदल्या

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा पोलीस ठाण्याच्या (Newasa Police Station) पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार प्रभारी अधिकारी बाजीराव पोवार (Police Inspector Bajirao Powar) यांनी स्विकारल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर (Assistant Inspector of Police Vijay Thakur) तसेच कार्यकाल संपल्याने प्रदीप शेवाळे यांची बदली (Transfer) झाली. त्यानंतर काल पोलीस ठाण्यातील (Police Station) 6 कर्मचार्‍यांच्या पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांच्या आदेशाने बदल्या झाल्या आहेत.

- Advertisement -

याबाबत पोलीस अधिक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी तात्पुरत्या स्वरुपात या नेमणुका केल्या असल्याचे आदेशात म्हटले आहे. बदली (Transfer) करण्यात आलेल्यांमध्ये एक हवालदार, तिघे पोलीस नाईक व दोघा पोलीस शिपायांचा समावेश आहे.

पोलीस हवालदार (हेडकॉन्स्टेबल) विठ्ठल उत्तम गायकवाड यांची अकोले पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस नाईक सुहास दादू गायकवाड यांची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. पोलीस नाईक जयवंत रखमनाथ तोडमल यांची कर्जत पोलीस पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. पोलीस नाईक वसिम मुस्तफा इनामदार यांची पारनेर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.

पोलीस शिपाई शाम बाबासाहेब गुंजाळ यांची जामखेड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर पोलीस शिपाई अंकुश दत्ता पोटे यांची घारगाव पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या