Friday, April 25, 2025
Homeनगरनेवाशाच्या पोलिसाची टाकळीभानमध्ये आत्महत्या

नेवाशाच्या पोलिसाची टाकळीभानमध्ये आत्महत्या

श्रीरामपूर (प्रतिनिधी)– तालुक्यातील टाकळीभान येथील पोलीस दलात सेवेत असलेले बापुराव कारभारी रणनवरे यांनी टाकळीभान येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कुटुंंबातील कोणताही सदस्य यावेळी घरात नसल्याने आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी नैराश्येपोटी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात होते.

एक उत्कृष्ठ कब्बडी खेळाडू म्हणून 1994 साली पोलीस सेवेत बापुराव रणनवरे रुजू झाले होते. कब्बडी खेळातून पोलीस दलात सेवा करीत असताना व त्यापूर्वीही त्यांनी खेळाचे मैदान गाजविले होते. रविवारी दुपारी येथील लक्ष्मीवाडी परिसरातील त्यांच्या रहात्या घरी कुटूंबातील कोणीही सदस्य नसल्याने दुपारी 3.30 च्या दरम्यान घराच्या एका खोलीत छताला दोर बांधून त्यांनी आत्महत्या केली. काही वेळाने त्यांचा छोटा पुतण्या घराकडे आल्याने त्याने झालेला प्रकार पाहून आरडाओरड केल्याने शेजारी नागरिकांनी तिकडे धाव घेतली. काही तरुणांनी मेजर रणनवरे यांचे लटकलेले शरीर खाली घेवून तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय सूत्रांनी ते मृत झाल्याचे घोषित केले.

- Advertisement -

ही वार्ता समजताच अनेक पोलीस कर्मचार्‍यांनी व ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन होऊ शकले नव्हते. मेजर रणनवरे सध्या नेवासा ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पो.हे.कॉ. पदावर होते.  त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...