Wednesday, June 17, 2026
HomeनगरNewasa : नेवासा-श्रीरामपूर राज्यमार्गावर कारने घेतला पेट

Newasa : नेवासा-श्रीरामपूर राज्यमार्गावर कारने घेतला पेट

कारमधील प्रवासी सुखरूप || काहीकाळ वाहनांची कोंडी

पाचेगाव फाटा |वार्ताहर| Pachegaon Phata

चालत्या किंवा उभ्या चारचाकी गाड्या पेटण्याच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. शॉर्टसर्किट, इंधन गळती किंवा अपघातामुळे गाड्यांना अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात श्रीरामपूर कडून नेवासाकडे जात असलेल्या क्रेटा कंपनीच्या गाडीने नेवासा हद्दीतील साईनाथनगर परिसरात अचानक पेट घेतला. राज्य मार्गावर या पेटत्या गाडीचा थरार पाहून येणार्‍या जाणार्‍या नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.ही घटना मंगळवार दि 16 जून रोजी रात्री साडे आठच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

या वाहनाने कोणत्या कारणाने अचानक पेट घेतला हे समजू शकले नाही, सुदैवाने वेळीच पेटलेल्या वाहनातून तरुण बाहेर आल्याने त्याचा जीव वाचला असे प्रथमदर्शनी नागरीकांनी सांगितले. वाहनांना अचानक आग लागण्यामागे वायरिंगमध्ये बिघाड (शॉर्ट सर्किट), इंधनाची गळती किंवा वाहनाचा वेग अनियंत्रित होऊन अपघात होणे ही प्रमुख कारणे मानले जात असले तरी या पेटलेल्या वाहनांचे कारण समजले नाही. वाहन चालवीत असताना वायरिंग पेटल्याचा वास आल्याने गाडी भर रस्त्यातून साईडला घेत रस्त्याच्या कडेला लावून गाडीतून तरुण बाहेर आल्याची माहिती मिळाली.

वाहनांनी पेट घेतल्याने वाहतूक कोंडी निर्माण होऊन राज्यमार्ग काहीकाळ ठप्प झाल्याची माहिती प्राप्त झाली. त्यात आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती प्राप्त झाली होती,पण आग मोठ्या प्रमाणात असल्याने आणि तीव्र वार्‍यामुळे लागलेल्या आगीत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सदरचे वाहन नेवासा येथील गरूटे यांचे असल्याची चर्चा घटनास्थळावर होती.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...