Monday, May 27, 2024
Homeनगरनेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची सोशल मीडियावरही होतेय चर्चा

नेवासा-श्रीरामपूर रस्त्याच्या दुरवस्थेची सोशल मीडियावरही होतेय चर्चा

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा -श्रीरामपूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.

- Advertisement -

अनेकांच्या जीवाला इजा झाली असून या रस्त्यावर प्रवास करताना कोणता खड्डा हुकवावा हा या रस्त्याने प्रवास करणार्‍या प्रत्येक नागरिकाला पडत आहे

बेलपिंपळगाव फाटा ते टाकळीभान हा रोड मात्र जास्त प्रमाणात खराब झाला असून अनेक वाटसरू या ठिकाणी खड्ड्यात पडून जखमी झाले आहे. गेल्या काही दिवसात मात्र या रोडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ‘शोले’ चित्रपटामधील जय आणि विरु यांचा फोटो वापरून या रोडच्या दुरवस्थेची खिल्ली उडवली जात आहे.

हिंदी चित्रपट कलाकार धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांना गोळी लागल्यावर विचारतो तो फोटो वापरून अनेकांनी या धर्मेंद्र अमिताभ बच्चन यांना विचारतो की कुठे पडला? तर अमिताभ बच्चन नेवासा-श्रीरामपूर रोडवर पडलो असे उत्तर देतो.

या मेसेजची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत असून रस्त्याचे काम करण्याची मागणी होत आहे. अनेकांना या खड्ड्यात पडून इजा झाली आहे. या रोडवरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते पण या खड्ड्यामुळे अनेक ठिकाणी कोंडी सुरू आहे. याची काळजी घेण्यात येऊन रस्ता चांगला व्हावा अन्यथा मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष किरवण साठे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या