Saturday, May 4, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यावर दाट धुक्याची चादर

नेवासा तालुक्यावर दाट धुक्याची चादर

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

आवकाळी पावसाचे (Heavy Rain) तडाख्या नतंर संपूर्ण तालुक्याने २७ जानेवारीची पहाट  गुलाबी थंडी (Cold) व दाट धुक्याने (Fog) अनुभवली.

- Advertisement -

गुलाबी थंडी (Cold) आणि दाट धुके असे मनमोहक वातावरण शुक्रवारी सकाळी नेवासकरांनी  अनुभवले. दि.२७ जानेवारी रोजी पहाट पासूनच सर्वत्र दाट धुके पसरले होते. धुक्यामुळे (Fog) सकाळी उशिरा पर्यंत सूर्यदर्शन झाले नाही.

वाहन चालकांना  धुक्यामुळे (Fog) नीट रस्ताही दिसत नव्हता.  रस्त्याचा (Road) अंदाज घेत  दिवे सुरू ठेऊन ऊसाने भरलेली व इतर वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू होती.पाच-दहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती.

गेल्या दोन दिवसांपासून थंडी, आवकाळी पाऊस आणि धुके असे विचित्र वातारणाचा अनुभव शेतकरी घेत आहेत. हवामानात  अचानक  होत असलेला बदल व त्यामुळे होणारे अनिष्ट परिणाम सर्वानाच भोगावे लागत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या