Saturday, July 27, 2024
Homeनगरनेवासा तालुक्यात 27 गावांत 56 बाधित

नेवासा तालुक्यात 27 गावांत 56 बाधित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात (Newasa Taluka) करोना संक्रमितांच्या (Covid 19 Positive) संख्येत काल मोठी वाढ झाली. काल गुरुवारी एकाच दिवसात तालुक्यातील 27 गावांतून 56 बाधित (Positive) आढळून आले. सर्वाधिक 8 बाधित देडगावात, 7 बाधित खरवंडीत (Kharwandi) तर गेवराईत (Gevrai) चौघे बाधित आढळले.

- Advertisement -

कुकाणा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kukana Primary Health Center) बाधितांची सर्वाधिक संख्या आहे. येथे चार गावातून 14 बाधित (Positive) आढळले. त्यात देडगाव (Dedgav) येथे 8, तेलकुडगाव येथे तिघे, कुकाण्यात (Kukana) दोघे तर शहापुरात एक बाधित आढळला. चांदा केंद्राअंतर्गत 9 बाधित आढळले. त्यात चांद्यात तिघे, मांडेगव्हाण व रस्तापूर येथे प्रत्येकी दोघे तर माका व पाचुंदा येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला. उस्थळदुमाला केंद्राअंतर्गत 8 बाधित आढळले असून त्यात खरवंडीत 7 तर उस्थळदुमाला येथे एकजण संक्रमित आढळला.

शिरसगाव (Shirasgav) केंद्रांतर्गतही 8 बाधित आढळून आले. त्यात गेवराई येथे चौघे, पाथरवाला येथे दोघे तर पिंपरीशहाली व सुलतानपूर येथील एकाचा समावेश आहे.

नेवासा बुद्रुक (Newasa Budruk) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 6 जण बाधित आढळले. त्यात उस्थळखालसा येथे दोघे तर बेलपिंपळगाव, गोधेगाव, सुरेगाव व पाचेगाव येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

नेवासा खुर्द (Newasa Khurd) (शहर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तीन गावातून पाच बाधित आढळले. त्यात नेवासा शहरात तिघे तर वाटापूर व अमळनेर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळला.

सोनई (Sonai) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत करजगाव, लोहगाव व शिंगणापूर येथे प्रत्येकी एकजण बाधित आढळून आला. टोका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत काल एकही संक्रमित आढळून आला नाही.

अशाप्रकारे 27 गावांतून 56 करोना बाधित (Covid 19 Positive) आढळून आले असून तालुक्यातील एकूण करोना बाधितांची (Covid 19 Positive) संख्या 14 हजार 848 इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या