Friday, May 16, 2025
Homeनगरनेवासा तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे 8 गट तर पंचायत समितीचे 16 गण

नेवासा तालुक्यात आता जिल्हा परिषदेचे 8 गट तर पंचायत समितीचे 16 गण

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

- Advertisement -

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी तालुकानिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची पुनर्रचना करण्यात आली असून यावर हरकतींसाठी जिल्हाधिकारी यांनी 8 जूनपर्यंत मुदत दिली आहे. नेवासा तालुक्यात या नव्या रचनेत एक गट व दोन गण वाढले आहेत.

नेवासा तालुक्यात 2017 च्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे 7 गण व पंचायत समितीचे 14 गण होते. एकूण सव्वादोन लाख मतदार (2 लाख 24 हजार 905) जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी होते. आता मतदारांची संख्या वाढली असून जिल्हा परिषदेचा एक गट व पंचायत समितीचे दोन गट वाढवण्यात आल्याने जिल्हा परिषद गटांची संख्या 8 तर पंचायत समिती सदस्यांची संख्या 16 असणार आहे.

बेलपिंपळगाव गटात 2017 च्या निवडणुकीत बेलपिंपळगाव व सलाबतपूर हे गण होते. आता प्रवरासंगम हा गण बनवण्यात येवून तो या गटात समाविष्ट करण्यात आला आहे तर सलाबतपूर हा स्वतंत्र गट आहे.

यावेळी सलाबतपूर हा स्वतंत्र गट बनवताना त्यात सलाबतपूरसह खामगाव या नव्या गणाचा समावेश केला गेला आहे. पूर्वीच्या कुकाणा गटाचे अस्तित्व यावेळी संपलेले असून भेंडा बुद्रुक गटात कुकाणा हा एक गण असेल. भेंडा बुद्रुक गटात पूर्वी भेंडा बुद्रुक व मुकिंदपूर हे दोन गण होते. आता भेंडा बुद्रुक व कुकाणा हे दोन गट असतील. मुकिंदपूर गण आता भानसहिवरे गटात समाविष्ट करण्यात आला आहे.

भानसहिवरे गटात याआधी भानसहिवरे व पाचेगाव या दोन गणांचा समावेश होता. आता पाचेगाव स्वतंत्र गट बनवण्यात आला असून भानसहिवरे गटात भानसहिवरे व मुकिंदपूर हे दोन गण असतील.

पाचेगाव हा स्वतंत्र गट बनवण्यात आला असून यात पाचेगाव व करजगाव हे दोन गण असतील. मागील निवडणुकीत करजगाव गणाचा खरवंडी गटात समावेश होता. यावेळी खरवंडी गटाचे अस्तित्व संपवण्यात आले आहे.

शिंगणापूर हा नव्याने गट तयार करण्यात आला असून यात नवीन शिंगणापूर गण तसेच जुना खरवंडी गण समाविष्ट केला आहे. 5 ग्रामपंचायतींचा खरवंडी व 7 ग्रामपंचायतींचा शिंगणापूर असा 12 ग्रामपंचायतींचा शिंगणापूर गट असेल.

सोनई गटात पूर्वीप्रमाणेच सोनई व घोडेगाव हे गण कायम राहणार आहेत. मात्र सोनई गटात आता केवळ सोनई व वंजारवाडी ही दोनच गावे असतील तर घोडेगाव गणात 6 ग्रामपंचायतींचा समावेश असेल. पुर्वीचे घोडेगाव गणातील वंजारवाडी गाव सोनई गणात समाविष्ट केले आहे.

चांदा गटात पुर्वीप्रमाणेच चांदा व देडगाव हे दोन गण कायम आहेत. चांदा गणात 8 गावांच्या 7 ग्रामपंचायती तर देडगाव गणात 6 ग्रामपंचायती असा 14 गावांच्या 13 ग्रामपंचायतींचा हा गट असेल.

वरीलप्रमाणे तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या 130 गावांची 8 गटांच्या अंतर्गत 16 गणांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. एक जिल्हा परिषद सदस्य व दोन पंचायत समितीचे अधिक सदस्य यावेळी निवडून जातील.

नेवासा तालुक्यातील गट व गणांची रचना

1) बेलपिंपळगाव गट (28 गावे, 19 ग्रामपंचायती) :

बेलपिंपळगाव गण (13 गावे, 10 ग्रामपंचायती)- बेलपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूर, बेलपांढरी, सुरेगावगंगापूर, बोरगाव, उस्थळखालसा, भालगाव, गोधेगाव, बहिरवाडी, धामोरी, टोका व वाशिम.

प्रवरासंगम गण (15 गावे 9 ग्रामपंचायती)- मुरमे, मडकी, खलालपिंप्री, बकुपिंपळगाव, प्रवरासंगम, माळेवाडीखालसा म्हाळापूर, खेडलेकाजळी, मंगळापूर, गळनिंब, गोगलगाव, शिरसगाव, वरखेड, माळेवाडीदुमाला सुरेगाव तर्फे दहिगाव.

2) सलाबतपूर गट (19 गावे, 17 ग्रामपंचायती) :

खामगाव गण (12 गावे, 10 ग्रामपंचायती)- रामडोह, गोपाळपूर, खामगाव, वाकडी, पिंप्रीशहाली, गोयगव्हाण, पाथरवाले, सुलतानपूर, सुकळीबुद्रुक, सुकळीखुर्द, नांदुरशिकारी, वडुले.

सलाबतपूर गण (7 गावे 7 ग्रामपंचायती)- गिडेगाव, गेवराई, नजिकचिंचोली, दिघी, सलाबतपूर, जळके खुर्द, जळके बुद्रुक.

3) भेंडा बुद्रुक गट (12 ग्रामपंचायती) :

कुकाणा गण (6 ग्रामपंचायती)- तरवडी, अंतरवली, चिलेखनवाडी, देवसडे, जेऊर हैबती, कुकाणा.

भेंडा बुद्रुक गण (6 ग्रामपंचायती)- भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, सौंदाळा, देवगाव, नागापूर, रांजणगाव.

4) भानसहिवरे गट (18 गावे, 16 ग्रामपंचायती) :

मुकिंदपूर गण (10 गावे, 9 ग्रामपंचायती)- गोंडेगाव, म्हसले, बाभुळखेडे, पिचडगाव, खुणेगाव, मक्तापूर, खडका, मुकिंदपूर, हंडिनिमगाव, सुरेशनगर.

भानसहिवरे गण (9 गावे, 7 ग्रामपंचायती)- भानसहिवरे, कारेगाव, माळीचिंचोरा, उस्थळदुमाला, बाभुळवेढे, नवीनचांदगाव, निपाणीनिमगाव, नारायणवाडी, धनगरवाडी.

5) पाचेगाव गट (18 गावे 17 ग्रामपंचायती) :

पाचेगाव गण (10 गावे, 9 ग्रामपंचायती)- नेवासा बुद्रुक, लेकुरवाळीआखाडा, जायगुडेआखाडा, चिंचबन, खुपटी, गोणेगाव, इमामपूर, गोमाळवाडी, पुनतगाव, पाचेगाव.

करजगाव गण (8 ग्रामपंचायती)- निंभारी, अमळनेर, वाटापूर, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडलेपरमानंद, बेल्हेकरवाडी.

6) शिंगणापूर गट (12 ग्रामपंचायती) :

खरवंडी गण (5 ग्रामपंचायती)- लांडेवाडी, गणेशवाडी, खरवंडी, तामसवाडी, वडाळा बहिरोबा.

शिंगणापूर गण (7 ग्रामपंचायती)- शिंगणापूर, हिंगोणी, कांगोणी, बर्‍हाणपूर, रस्तापूर, म्हाळसपिंपळगाव, फत्तेपूर.

7) सोनई गट (8 ग्रामपंचायती) :

सोनई गण (2 ग्रामपंचायती)- सोनई व वंजारवाडी.

घोडेगाव गण (6 ग्रामपंचायती)- धनगरवाडी, मोरयाचिंचोरे, लोहगाव, पानसवाडी, घोडेगाव, झापवाडी.

8) चांदा गट (14 गावे 13 ग्रामपंचायती) :

चांदा गण (8 गावे 7 ग्रामपंचायती)- वांजोळी, शिंगवेतुकाई, राजेगाव, मांडेगव्हाण, मोरगव्हाण, लोहारवाडी, चांदा, कौठा.

देडगाव गण (6 ग्रामपंचायती)- महालक्ष्मीहिवरे, माका, पाचुंदा, शहापूर, देडगाव, तेलकुडगाव.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...