Saturday, May 4, 2024
Homeनगरनेवासा : ट्रॅक्टरच्या पैशासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ

नेवासा : ट्रॅक्टरच्या पैशासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

ट्रॅक्टर घेण्याकरिता आई-वडीलाकडुन 4 लाख रुपये घेवुन यावे, यासाठी दमदाटी करून शारिरिक व माणसिक छळ केल्या

- Advertisement -

प्रकरणी पत्नीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात देडगाव मधील पती, सासू-सासर्‍यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील देडगाव येथील शितल आवजीबाबा लोखंडे (वय 27) हल्ली रा. पाचुंदा, ता. नेवासा या विवाहितेने नेवासा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न दि. 23 मे 2010 रोजी माझ्या वडीलानी धार्मिक पध्दतीने पाचुंदा येथे करुन दिले होते.

माझे सासर देडगाव ता. नेवासा येथे असुन मला देडगाव येथे आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे यास दिले होते. लग्नानंतर मी सासरी नांदणेस गेले असता घरामध्ये पती आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे, सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, सासु लक्ष्मिबाई गंगाधर लोखंडे, भाया अंबादास गंगाधर लोखंडे,जाव मिना अंबादास लोखंडे सर्व रा. देडगाव,ता.नेवासा असे होते.

मी सासरी नांदत असताना मला घरातील वरील सर्व लोकांनी सुमारे 3 वर्ष चांगले नांदविले. त्या नंतर ते मला घरामधे त्रास देवु लागले, शिवीगाळ करु लागले व मला म्हणाले की शेतीचे कामासाठी तुझे माहेराहुन एक लाख रुपये घेवुन ये असे म्हणुन माझा शारीरिक व माणसिक छळ करू लागल्याने मी सणावराला माहेरी आल्या नंतर मला होत असलेल्या पैशाची मागणी बाबत आई-वडीलाना सांगत असे.

मी नांदत असताना मला दोन मुले झालेले असुन त्या नंतर पुन्हा मला शिवीगाळ करुन मारहाण करुन उपाशी पोटी ठेवु लागले व मला वरील लोक म्हणाले की आम्हाला शेतीच्या कामा करिता ट्रॅक्टर घेवायचा आहे. त्याकरिता तुझे आई वडीला कडुन 4 लाख रुपये घेवुन ये. असे म्हणुन मला दमदाटी देवुन माझा पुन्हा शारिरिक व माणसिक छळ करू लागले.

परंतु माझे आई वडीलाची परिस्थिती अत्यंन्त गरिबीची असल्याने मी त्याना म्हणत असे की मी एवढे पैसे आणु शकत नाही. असे त्याना सांगुन वरील लोकांचा त्रास सहन करुन तेथेच नांदत असे. परंतु त्या नंतर वरील लोक मला जास्त त्रास देवु लागल्याने मी त्याच्या त्रासाला कंटाळुन माझे लहाण मुलीसह दि .21/6/2019 रोजी माझे माहेरी पाचुदा, ता.नेवासा येथे आले होते.

त्यानंतर लग्नानतर सुमारे 3 वर्षानंतर पुन्हा शेतीचे कामा करिता ट्रॅक्टर घेणे करिता 4 लाख आणावेत या कारणावरुन पती आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे, सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, लक्ष्मिबाई गंगाधर लोखंडे, अंबादास गंगाधर लोखंडे, मिना अंबादास लोखंडे सर्व रा.देडगाव ता. नेवासा यांनी मला नेहमी शिवीगाळ करुन मारहाण करुन दमदाटी देवुन वेळोवेळी उपाशी पोटी ठेवुन माझा शारिरिक व मानसिक छळ केला आहे. म्हणून फिर्याद दिली आहे.

या फिर्यादी वरून नेवासा पोलिसांनी आवजीबाबा उर्फ संभाजी गंगाधर लोखंडे, सासरे गंगाधर यशवंत लोखंडे, लक्ष्मिबाई गंगाधर लोखंडे, अंबादास गंगाधर लोखंडे, मिना अंबादास लोखडे यांचे विरुध्द भादवी कलम 498 (अ),323,504,506,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोहेका बी.जी.पवार पुढील तपास करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या