Wednesday, May 22, 2024
Homeनगरनेवासा कोषागार कार्यालय आवारातून डंपर चोरून नेताना पुढे झाले असे..

नेवासा कोषागार कार्यालय आवारातून डंपर चोरून नेताना पुढे झाले असे..

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा येथील कोषागार कार्यालयाच्या आवारात लावलेला वाळूचा पांढर्‍या रंगाचा डम्पर अज्ञात चोरट्यांनी डुप्लिकेट चावीचा वापर करुन पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली असून याबाबत प्रभारी कामगार तलाठी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत प्रभारी कामगार तलाठी बद्रीनाथ कमानदार यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, एमएच 16 एएल3555 या क्रमांकाचा पांढर्‍या रंगाचा डम्पर कोषागार कार्यालय आवारात लावलेला होता. तो 24 ऑगस्ट रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने डुप्लिकेट चावीने चालू करून चोरून घेऊन जात असताना तो नेवासा शहरातील तुकाराम महाराज मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर उलटला. डंपरच्या समोरील काचा फोडून नुकसान केले. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 व 511 प्रमाणे अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या