Saturday, May 4, 2024
Homeनगरमुळाकाठ परिसरात वाळु लिलाव व वाळु डेपो विरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको

मुळाकाठ परिसरात वाळु लिलाव व वाळु डेपो विरोधात ग्रामस्थांचा रास्तारोको

करजगांव | वार्ताहर

शासनाने जाहीर केलेल्या नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथिल मुळानदी पात्रातुन वाळु लिलाव व निंबारी येथिल वाळु डेपोच्या विरोधात मुळाकाठ परिसरातील गावांनी गाव बंद ठेवुन आज सकाळपासुन करजगाव-नेवासा रस्त्यावरील लक्ष्मीआई चौकात रास्ता रोको सुरू केला आहे. तसेच सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर झाला आहे.

- Advertisement -

काल शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत तहसिलदार संजय बिरादार ,सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पुलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी उपोषण ठिकाणी येत ग्रामस्थांशी चर्चा केली होती.मात्र चर्चे अंती कुठलाही निर्णय न झाल्यामुळे व तहसीलदार यांनी लेखी आश्वासन दिल्याने ग्रामस्थ आंदोलनावर ठाम राहिल्याने प्रशासन व ग्रामस्थ यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Weather Update : राज्यात उष्णतेची लाट, ७२ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे

आज सकाळपासुन मुळाकाठ परिसरातील सर्व गावे बंद ठेवुन लक्ष्मीआई चौकात रास्तारोको आंदोलनामध्ये अंमळनेर, निंभारी, करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले-परमानंद, गोमळवाडी,वाटापुर,खुपटी, तसेच राहुरी तालुक्यातील वांजुळपोई, तिळापुर, मांजरी, तसेच मुळाकाठ परिसरातील गावातील ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ सहभागी झाले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द

वाळू लिलाव व डेपो लिलाव कायम स्वरुपी बंद करण्यासाठी संपूर्ण मुळा नदी काठ एक वटला असुन नदी पात्रातुन वाळुचा एकही खडा उचलु न देण्याचा निर्धार मुळाकाठच्या ग्रामस्थांनी केला आहे.यामुळे भविष्यात जिल्हा प्रशासन व मुळा काठ परिसरातील ग्रामस्थ यांच्यामध्ये मोठा संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या