Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात

नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या गाडीला अपघात

बीड । Beed

- Advertisement -

बीड लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनेवणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सोलापूर-धुळे महामार्गावर बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीचा अपघात झाला. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.

बीडमधली लढत ही अत्यंत अटीतटीची झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा बीड लोकसभा मतदारसंघात सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर बजरंग सोनावणे हे मध्यरात्रीच जरांगेच्या भेटीसाठी निघाले त्यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा ६ हजार ५८५ मतांनी पराभव केला आहे. दरम्यान केवळ सहा मतदान यंत्र मोजणे बाकी होती. मात्र, त्यामध्येही बजरंग सोनवणेंनी बाजी मारली. पंकजा मुंडेंकडून बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेर मतमोजणी करण्यात आली. त्या मतमोजणीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या