Monday, June 17, 2024
Homeनगरपुढील महिन्यांत सरकारी शाळेत मिळणार पाठ्य पुस्तके

पुढील महिन्यांत सरकारी शाळेत मिळणार पाठ्य पुस्तके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

दरवर्षी सरकारी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात मोफत पाठ्यपुस्तके पडतात. मात्र, यंदा करोनाच्या स्थितीमुळे मोफत पाठ्य पुस्तकांना उशीर झाला असून पुढील महिन्यांत पाठ्य पुरस्तके उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने 3 लाख संचाची मागणी पाठ्य पुस्तक मंडळाकडे नोंदवली आहे. दुसरीकडे मागील वर्षी वाटप करण्यात आलेल्या पाठ्य पुस्तकांपैकी अवघे 22 हजार संच परत जमा झाली आहेत.

सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेसह सर्व अनुदानित शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्याचे वाटप होते. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत 4 लाख 66 हजार विद्यार्थी असून त्यांना 2 लाख 96 हजार संच आणि 24 लाख 20 हजार पाठ्यपुस्तकांची गरज आहे. मागील वर्षी करोनामुळे जूनअखेर ही पुस्तके वाटप करण्यात आली होती. यंदाही शाळा सुरू झाल्या नसल्या तरी मुलांना पुस्तकांचे वाटप होणार आहे.

करोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांकडे पुस्तके सुस्थितीत असतील तसेच शासनाची आर्थिक स्थिती लक्षात घेता पुस्तकांचा पुनर्वापर व्हावा, या हेतूने मागील वर्षीची पुस्तके गोळा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. शिक्षकांनी सुटीमध्ये ही पुस्तके गोळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 22 हजार 173 पुस्तकांचे संच जमा होऊ शकली. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांसाठी अडीच लाखांच्या जवळपास पुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात पाठ्य पुस्तकांचे संच उपलब्ध होणाची शक्यता शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आली

जिल्हा परिषदेकडून शासनाकडे 23 लाख पुस्तकांची मागणी नोंदवली आहे. सध्या पुस्तके नसली तरी शिक्षकांकडून ऑनलाईन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिला जात आहे. बुधवारी (काल) पुस्तकाच्या नियोजनासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून नियोजन सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे लवकरच जिल्ह्यात मोफत पाठ्य पुस्तके दाखल होणार आहेत.

– शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

- Advertisment -

ताज्या बातम्या