Saturday, October 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात

नाशिक जिल्ह्यातील 'या' शहरात कारवाई

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात एनआयए (NIA) आणि एटीएसने (ATS) संयुक्त कारवाई करत तीन जिल्ह्यात (District) छापेमारी केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगावचा समावेश असून याप्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएकडून देश विघातक कार्य करणाऱ्या तरुणांवर देशभरात कारवाई सुरु आहे. देशभरात अनेक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यात आज पहाटेपासून महाराष्ट्रामध्येही (Maharashtra) तीन ठिकाणी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने छापेमारी आणि कारवाई केली आहे. यामध्ये जालना शहरातील रामनगर चमडा बाजार परिसरात एका संशयिताची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. जालन्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून आज सकाळी चार वाजेपासून एनआयएकडून चौकशी सुरु होती. चौकशी सुरू असलेला तरुण हा चमड्याचा व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील आझाद चौक परिसरामध्ये आणि किराड पुरा भागामध्ये एनआयए तसेच एटीएसने छापेमारी केली आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधील आझाद चौका जवळून एक आणि एन सिक्स परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. हे तिघेही देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते, असे बोलले जात आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मालेगाव शहरातील (Malegaon City) पवारवाडी रोडवरील अब्दुल्लानगरमधील एका डॉक्टरच्या होमिओपॅथी क्लिनिकवर एनआयने छापा (Raid) टाकला आहे. याठिकाणी रात्रीपासून चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मालेगावमध्ये इतरही काही ठिकाणी केंद्रीय संस्थांनी छापा टाकल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कारवाईत जम्मू काश्मीरमधील संघटनांशी संबंध असणाऱ्या काही तरुणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या