Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! मुंबई, पुण्यात NIA ची छापेमारी; ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून...

मोठी बातमी! मुंबई, पुण्यात NIA ची छापेमारी; ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात

मुंबई | Mumbai

देशातील विविध ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) म्हणजेच एनआयएसह (NIA) ईडीची (ED) छापेमारी सुरु आहे. अशातच आता एनआयएने मुंबई आणि पुण्यातील पाच ठिकाणी छापे टाकले असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून २८ जून रोजी मुंबईतील नागपाडा येथील रहिवाशांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर येथील काही जण ISIS च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएकडून संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले.

तसेच पुणे शहरातील कोंढवा परिसरात एनआयएने छापा टाकला असून तपास संस्थांचे पथक आज पहाटेच कोंढव्यात पोहचले. त्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वजीर कस्केड सोसायटीमध्ये छापेमारी केल्याचे समजते. या ठिकाणावरुन जुबेर शेख (३९) यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर या कारवाईत एनआयएने काही कागदपत्रे जप्त केल्याचे बोलले जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या