Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्यावातावरणात बदल : रात्री थंडी,दिवसा ऊन; चटका जाणवणार

वातावरणात बदल : रात्री थंडी,दिवसा ऊन; चटका जाणवणार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कमी झालेली थंडी (Cold) फेब्रुवारीच्या सुरूवातीला एकदा जाणवू लागली होती. पंरतु, त्यानंतर मात्र राज्यामधून थंडी पुन्हा गायब होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचा अंतर्गत कलह विकोपाला! बाळासाहेब थोरातांनी दिला राजीनामा?

राज्यातील काही भागांत सकाळच्या सुमारास थोड्या प्रमाणावर थंडी जाणवत असून किमान तापमानात (Minimum Temperature) वाढ होत आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात थंडीचा जोर कायम असल्याची माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) दिली असून आज (दि.०७) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, यासोबतच राज्याच्या काही भागांत बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या वर गेला आहे. तर कमाल तापमानातही (Maximum Temperature) वाढ होत असून अनेक ठिकाणी पारा ३१ अंशांच्या वर असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. तर दुसरीकडे मागील २४ तासांत नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisment -

ताज्या बातम्या