Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत रात्रीचा कर्फ्यू

औरंगाबादेत रात्रीचा कर्फ्यू

औरंगाबाद- Aurangabad

गेल्या काही दिवसांत वाढत चाललेली रुग्णसंख्या पाहता कोरोनाला औरंगाबाद शहरात अटकाव घालण्यासाठी आज मंगळवारपासून १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी अंमलात राहील.

- Advertisement -

औरंगाबादेत तीनच दिवसांत ४७७ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सोमवारी १३२, रविवारी २०१, शनिवारी आढळलेल्या १४४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची ही संख्या वाढत चालल्याचे पाहून प्रशासनाने मोठे पाऊल उचलले असून आजपासून १४ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.

जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडे आणि पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादेत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या