Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNilesh Chavhan Arrested: सराईत गुन्हेगाराप्रमाणे सतत ठावठिकाणा बदलत गेला; पण पोलिसांना निलेश...

Nilesh Chavhan Arrested: सराईत गुन्हेगाराप्रमाणे सतत ठावठिकाणा बदलत गेला; पण पोलिसांना निलेश चव्हाण कसा सापडला?

पुणे | Pune
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी निलेश चव्हाण नेपाळ सीमेवरुन अटक झाली आहे. गेल्या ९ दिवसांपासून तो फरार होता. पोलिसांची ७ पथकं त्याच्या मागावर होती. अखेर नेपाळमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणची कॉलर पकडत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. निलेश चव्हाणचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ निलेश चव्हाणच्या ताब्यात होते. चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या अतिशय जवळचा आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्याची अटक महत्त्वाची आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. वैष्णवीच्या कुटुंबाला त्याने बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. अटकेची कुणकुण लागताच निलेश चव्हाण फरार झाला. निलेश चव्हाण देशाबाहेर जाऊ नये यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लूकआऊट नोटिस जारी केली होती. पण तरीही चव्हाण आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. नेपाळच्या भैरहवामधील एका लॉजमध्ये त्याच्या मुसक्या आवळल्या.

- Advertisement -

आरोपी निलेश चव्हाण हा गेल्या १० दिवसांपासून फरार होता. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके तर पुणे पोलिसांची तीन पथके राज्यात आणि देशातील इतर राज्यांमध्येही शोध घेत होते. तो पुणे, दिल्ली, गोरखपूरमार्गे नेपाळला पोहचला होता. त्याला तिथपर्यंत पोहचण्यासाठी कोणी कोणी मदत केली याचा तपास करण्यात येणार आहे. नेपाळमधून निलेश चव्हाणला विमानाने पुण्यात आणणार आहे.

YouTube video player

सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात निलेश चव्हाण हा एका बसमधून फरार झाला आहे. निलेश चव्हण पुण्याहून कर्जत, मुंबई, मध्यप्रेदश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गोरखपूर असा प्रवास करत त्याने नेपाळबॉर्डर गाठली आहे. त्याने बायरोड प्रवास केला असून सतत वाहन तो बदलत होता. निलेश चव्हाण पुण्याहून कारने दिल्लीला गेला. तिथून दुसऱ्या कारने गोरखपूरला गेला. गोरखपूरमधून तो नेपाळमधल्या भैरवा जिल्ह्यातल्या एका गावात गेला. त्या गावात तो लॉजमध्ये लपून बसला होता.

पुणे सोडून फरार झाल्यानंतर निलेश चव्हाणने एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे त्याचा ठावठिकाणा बदलला. तो मोबाईल किंवा अन्य कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत नव्हता. पेटीएम, एटीएम, गुगलपे यांचाही वापर त्याने टाळला. त्यामुळे त्याचा माग काढणे पोलिसांना अवघड जात होते. पण अखेर खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका लॉजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नो पार्किंगमधील दंडाच्या रकमेत कपात

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नो पार्किंग झोनमध्ये लावल्या जाणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनांवर आकारण्यात येणार्‍या दंडाच्या रकमेत महानगरपालिकेकडून कपात करण्यात आली आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या...