Monday, April 28, 2025
Homeनगर‘त्या’ अदृश्य शक्तींना मदत करणार : लंके

‘त्या’ अदृश्य शक्तींना मदत करणार : लंके

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

माझ्या यशात विरोधकांचाही वाटा आहे. त्यांचे नाव मी आता घेऊ शकत नाही. परंतु जे भाजपच्या व्यासपीठावर होते, ते मला सहकार्य करत होते. अशा अदृश्य शक्तींनी मला मदत केली आहे. या शक्तींना जेव्हा गरज भासेल तेव्हा मी त्यांना राजकीय मदत करेन, अशी प्रतिक्रिया नगर मतदार संघाचे नवे खासदार निलेश लंके (MP Nilesh Lanke) यांनी व्यक्त केली. दरम्यान, तुम्ही जाएंट किलर झाले का…या प्रश्नावर लंके यांनी उदयराजे भोसले यांच्यासारखी फक्त कॉलर उडवल्याने हास्यकल्लोळ उडाला.

- Advertisement -

खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लंके यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी निवडून येतच असतो…या वाक्याचा पुनरुच्चार करीत ते म्हणाले, माझ्या यशाचे खरे श्रेय शेतकरी, बेरोजगार तरुण यांना जाते. मी जायंट किलर ठरलो आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मला मनापासून साथ दिली. ज्यांनी दादागिरीची भाषा केली त्यांनाच ती आता लखलाभ होवो. कारण देनेवाला उपर है… माझ्या राजकीय जीवनात शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेली साथ मी विसरू शकत नाही. ते माझी जान आहेत व त्यांना भेटायला जाणार आहे.

मला आता कोणाविषयीही व काहीही बोलायचे नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी वडीलकीच्या नात्याने आधार दिला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे किरण काळे यांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले व महाविकास आघाडीच्या सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी मला ताकद दिली आहे, अशी भावनाही लंके यांनी व्यक्त केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Central Government Decision : केंद्र सरकारचा पाकिस्तानला दणका; १६ यूट्यूब चॅनेलवर...

0
नवी दिल्ली | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारताकडून (India) पाकिस्तान विरूद्ध विविध स्तरांवर कारवाई सुरू आहेत. अशातच आता भारत सरकारच्या गृह...