Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याNilesh Rane : निलेश राणेंचा राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर...

Nilesh Rane : निलेश राणेंचा राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय मागे; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर मंत्री रवींद्र चव्हाणांचे स्पष्टीकरण

मुंबई | Mumbai

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांचे पुत्र आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. निलेश राणेंच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. राणे यांच्या स्थानिक पातळीवरील राजकारणात भाजप नेते हस्तक्षेप करत असून त्यांच्याविरोधात दुसऱ्यांना रसद पुरवली जात असल्याच्या चर्चांमुळे त्यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्याचे बोलले जात होते…

- Advertisement -

दसरा मेळाव्यावरुन परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या बसचा अपघात; २५ जण जखमी

त्यानंतर आज भाजप नेते निलेश राणे यांची मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी भेट घेत मनधरणी केली. यानंतर निलेश राणे यांना घेऊन रवींद्र चव्हाण थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सागर या शासकीय निवास्थानावर पोहोचले. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यानंतर निलेश राणे यांची मनधरणी करत त्यांच्या अडचणी आणि नाराजीचे कारण समजून घेत त्याच्यांशी चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यापुढे देखील राजकारणात सक्रीय राहणार असल्याचे सांगितले.

Maratha Reservation : मंत्री गिरीश महाजनांचा मनोज जरांगे पाटलांना फोन; म्हणाले, उपोषण…

यावेळी बोलतांना मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, “निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडले हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असतांना कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये ही सर्वांची भावना आहे. छोट्या कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्यायला हव्यात असे त्यांचे म्हणणे होते. याबाबत आम्ही चर्चा केली”, असे चव्हाण यांनी म्हटले.

Maratha Reservation : अल्टिमेटम संपला! मनोज जरांगे आजपासून आमरण उपोषणाला बसणार

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “काल निलेश राणे यांनी जो निर्णय घेतला होता तो रागावून घेतला होता.आता मी स्वतः या विषयात लक्ष घालणार आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची कामे केली जातील. मी आग्रह केला असा निर्णय घेऊ नका. ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊ. आम्ही सर्वजण पक्षासाठी काम करत आहोत. लोकसभा विधानसभा निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची खबरदारी घेतली जाईल”, असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात चोरी; एक जण ताब्यात

- Advertisment -

ताज्या बातम्या