Sunday, September 15, 2024
Homeनगरनिळवंडे धरणात 83 टक्के पाणी

निळवंडे धरणात 83 टक्के पाणी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

- Advertisement -

नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 10468 दलघफू (95 टक्के) झाला आहे. निळवंडेत काल सायंकाळी 6943 दलघफू (83.37 टक्के) पाणीसाठा होता. या धरणातून प्रवरा नदीपात्रात 1568 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

पाणलोटात पाऊस कमी झाल्याने आवक कमालीची घटली आहे. भंडारदरात काल केवळ 35 दलघफू पाण्याची आवक झाली. तेवढाच वापरही झाला. त्यामुळे पाणीसाठा ‘जैसे थे’ आहे.

आढळा पाणलोटातही पाऊस नसल्याने पाण्याची आवक थांबली आहे. काल सकाळी 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 869 दलघफू (81.98 टक्के) झाला होता. जिल्ह्याच्या इतर भागातूनही मान्सून गायब झाल्याने नगरकरांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, कुकडी समूह धरणांमध्ये 20000 दलघफू (68 टक्के) पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी या धरणातील पाणीसाठा 21231 दलघफू होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या