Monday, October 19, 2026
HomeनगरBhandardara : निळवंडेचा साठा 38 टक्क्यांवर

Bhandardara : निळवंडेचा साठा 38 टक्क्यांवर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात 11039 क्षमतेचे भंडारदरा धरण रात्री उशीरा 45 टक्के भरले तर निळवंडेतील पाणीसाठा 38 टक्क्यांवर गेला आहे. शनिवारी सकाळपर्यंत 288 दलघफू पाण्याची आवक झाल्याने धरणातील पाणीसाठा 4488 दलघफू झाला होता. सायंकाळी हा पाणीसाठा 4572 दलघफू झाला होता. रात्री उशीरा हा पाणीसाठ्यात वाढ झाली होती.

- Advertisement -

निळवंडेतील पाणीसाठा रविवारी सायंकाळी 316दलघफू (38.02टक्के) झाला होता. पावसाबरोबर धुकेही पडत असल्याने कळसूबाई शिखर व कोकणकडा यात हरवल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार व रविवार अशी सुट्टी आल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.

आढळात 73 टक्के पाणीसाठा
वीरगाव वार्ताहराने कळविले की, आढळाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने आढळा धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढु लागला आहे. शनिवारी सायंकाळी 1060 दलघफू क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 758 दलघफू झाला होता. रविवारी सायंकाळी हा साठा 773 दलघफूवर गेला होता.

24 तासांतील पाऊस

भंडारदरा 40, घाटघर 48, पांजरे 28, रतनवाडी 52, वाकी 20 (आकडे मिमी मध्ये)

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ ऑक्टोबर २०२६ – डिजिटल व्यवहारांचे अर्थकारण आणि विश्वास

0
Daily Deshdoot Editorial 19 October 2026 भारताच्या डिजिटल क्रांतीने आर्थिक व्यवहारांचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. चहाच्या टपरीपासून मोठ्या मॉलपर्यंत आणि भाजीविक्रेत्यापासून नामांकित व्यापार्‍यापर्यंत सर्वत्र यूपीआय...