Saturday, November 23, 2024
Homeनगरनाबार्डकडून ‘निळवंडे’च्या उर्वरित कामांसाठी 800 कोटी रुपये मंजूर - ना. विखे

नाबार्डकडून ‘निळवंडे’च्या उर्वरित कामांसाठी 800 कोटी रुपये मंजूर – ना. विखे

राहाता |प्रतिनिधी| Rahata

जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून 800 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. यासंदर्भात ना. विखे पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्र देवून निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून नाबार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारने निधी देण्यास मान्यता दिली आहे.

- Advertisement -

निळवंडे धरण पूर्ण झाल्यानंतर कालव्यातून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. मात्र शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी पोहचण्यासाठी वितरिकांची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने भविष्यात निधीची अडचण होऊ नये यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून नाबार्डद्वारे निधी उपलब्ध करून दिला. नाबार्डमार्फत मंजूर झालेल्या निधीतून प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करून शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोच करणे हेच एक उद्दिष्ट असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी व शेतकर्‍यांना शाश्वत पाणी पुरवठा होण्याकरिता वितरण प्रणाली चांगल्या पध्दतीने कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने जलसंपदा विभागाने कार्यवाही सुरू केली असून नाबार्ड मार्फत होणार्‍या निधीतून ही कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीचा उपयोग होईल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या