Wednesday, September 11, 2024
Homeनगरनिळवंडेच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही - आ. थोरात

निळवंडेच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही – आ. थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

अनेक अडचणींवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून फक्त पाणी सोडणे बाकी होते, परंतु श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले. जीवनात निळवंडे धरण व कालवे पूर्ण झाल्याचा आनंद असून हे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकर्‍याच्या शेतात जाईल तो आपला आनंदाचा दिवस असेल. सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री, आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, सचिन दिघे, अनिल कांदळकर, दूध संघाचे संचालक भारत मुंगसे, नाशिक ममनपाचे नगरसेवक भागवत आरोटे, उत्तर नगर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष इंजि. सुभाष सांगळे, एकनाथ मुंगसे, राजेंद्र कहांडळ, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंगसे, प्रभाकर कांदळकर, अविनाश सोनवणे, हौशीराम सोनवणे, नवनाथ अरगडे, सखाराम शरमाळे, राजेंद्र मुंगसे, मच्छिंद्र सांगळे, अनिल गाजरे, ज्योती मोकळ, जिजाबाई मुंगसे, तुकाराम दिघे, भास्कर खेमनर, बाळासाहेब दिघे, आत्माराम जगताप आदींसह तळेगाव भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. निळवंडे धरण व कालव्यांची कामे त्यांनीच पूर्ण केली असून तेच पाणी देणार आहेत. काही लोक या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे, परंतु जनता त्यांना ओळखून आहे.

यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक भारत मुंगसे, नगरसेवक भागवत आरोटे, इंजि. सुभाष सांगळे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी दत्तू मुंगसे, शिवाजी आरोटे, संपत आरोटे, बाबासाहेब गाजरे, कारभारी मुंगसे, तुकाराम कहांडळ, अण्णासाहेब मुंगसे, रामनाथ धाकतोडे, विलास सोनवणे, विजय गोडगे, अलका मुंगसे, संगीता कहांडळ, सचिव शांताराम आरोटे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, चांगदेव ढेपे, श्रीराम मुंगसे, भाऊसाहेब दिघे, साहेबराव कहांडळ आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. सुभाष सांगळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर एकनाथ मुंगसे यांनी आभार मानले.

नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र केलेली आकर्षक विद्युत रोषणाई, सुवासिनींकडून औक्षण, फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक वाद्य, लेझीम पथक, मिरवणूक आणि अलोट गर्दीत जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा आ. बाळासाहेब थोरात यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या