मुंबई- सेलिब्रिटी शेफ ते फिल्ममेकर असा प्रवास करणार्या विकास खन्ना यांचा पहिलाच सिनेमा द लास्ट कलरला ऑस्कर पुरस्कारातील फीचर फिल्मच्या यादीत नामांकन मिळालं. स्वतः विकास यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. पहिल्याच सिनेमाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यामुळे सध्या विकास खन्ना फार आनंदी आहे. विकासने आपल्या ट्विटरवर लिहिले की, 2020 ची सर्वात चांगली सुरुवात.
जादू.. ऑस्कर अकादमीने 2019 मधील सर्वोत्तम 344 सिनेमांची घोषणा केली. यात द लास्ट कलर सिनेमाचा समावेश आहे. सार्यांना धन्यवाद. लास्ट कलर सिनेमातील अभिनेत्री नीना गुप्ता यांनी विकास यांच्या ट्वीटला रीट्वीट करत म्हटलं की, माझा विश्वास बसत नाहीये. मी खूप आनंदी आहे. याशिवाय नीना आणि विकास यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी अजून एक पोस्ट लिहिली.