नवी दिल्ली | New Delhi
एकीकडे देशातील अनेक भागांत पावसाने (Rain) दडी मारली असून दुसरीकडे हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते, घरे आणि शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेली आहे. तर शिमला येथील शिव बावडी मंदिरावर दरड कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला असून मंदिरात उपस्थित असणारे २० ते २५ भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे…
हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार; शिमल्यात भूस्खलन, ३० ते ३५ जण ढिगाऱ्याखाली अडकले
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिव बावडी मंदिरात पूजा करण्यासाठी काही भाविक (Devotee) आले होते. यावेळी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने २० ते २५ भाविक मंदिराच्या (Temple) ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, या घटनेवर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhwinder Singh Sukhu) यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. तसेच सुखू यांनी म्हटले की, या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू (Death) झाला असून ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. श्रावणी सोमवार असल्याने हे भाविक दर्शनासाठी आले होते. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ भाविक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून पोलिस आणि एनडीआरएफच्या मदतीने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी मारामारी करायची का?; राऊतांनी पवारांना थेट सुनावलं