Wednesday, June 26, 2024
Homeदेश विदेशFirecracker Factory Explosion : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू

Firecracker Factory Explosion : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

तामिळनाडूतील (Tamil Nadu) विरुधुनगर जिल्ह्यातील (Virudhunagar District) कममापट्टी गावात (Kammapatti Village) फटाक्यांच्या कारखान्यात (Firecracker Factory) भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे….

Rohit Pawar : “अजितदादांवरील आरोपामागे…”; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण स्फोटात (Terrible Explosion) चार जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग (Fire) आटोक्यात आणली.

शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; विधानसभा अध्यक्ष आधीचंच वेळापत्रक सादर करण्याची शक्यता

दरम्यान, या घटनेनंतर कारखान्याचे मालक राजेंद्र (६५) आणि त्यांचा जावई अरुण कुमार (३९) यांना पोलिसांनी (Police) अटक (Arrested) केली आहे. तर घटनेवेळी कारखान्यात दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर राजेंद्र यांनी फटाक्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ओव्हरटाईम करणाऱ्या आणखी ३० कामगारांना कामावर ठेवले होते, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा

- Advertisment -

ताज्या बातम्या