नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेतील (America) कॅलिफोर्नियामध्ये (California) दोन दिवसांत गोळीबाराच्या (Firing) दोन घटना घडल्या असून अमेरिका गोळीबाराने पुन्हा एकदा हादरली आहे. काल (दि.२३ रोजी) संध्याकाळी हाफ मून बे भागात गोळीबाराची घटना घडली होती. त्यावेळी या गोळीबारात ७ जणांचा मृत्यू (Death) झाला.
तर आयोवा राज्यात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक शिक्षक जखमी झाला आहे. तसेच या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी (Police)अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी २२ जानेवारीला कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील (Los Angeles) मॉन्टेरी पार्कमध्ये चिनी नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी या गोळीबारात अनेक जण जखमी झाले होते.