Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Crime News : चाेरलेल्या नऊ दुचाकी हस्तगत; युनिट दाेनची कारवाई, दाेघांना...

Nashik Crime News : चाेरलेल्या नऊ दुचाकी हस्तगत; युनिट दाेनची कारवाई, दाेघांना अटक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहर गुन्हेशाखा युनिट दोनच्या (City Crime Branch Unit Two) पथकाने दोघा दुचाकी चोरट्यांना अटक (Arrested) केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या तब्बल ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. तर तिसरा संशयित पसार झाला आहे. दीपक अशोक जाधव (वय ३४, रा. कनाशी, ता. कळवण, नि. नाशिक), सचिन पंढरीनाथ मोरे (वय २३, सध्या रा. रामलिंग, ता शिरूळ, जि.पुणे, मूळ रा. कनाशी, ता. कळवण, जि. नाशिक) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. योगेश दाभाडे (रा. नामपूर, ता. सटाणा, जि. नाशिक) हा फरार असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.

- Advertisement -

शहरातील वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचे दृष्टीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला आदेश दिले. त्यानुसार तपास सुरु असताना युनिट दोनचे हवालदार गुलाब सोनार यांना (दि.२८) वाहन चोरट्यांची माहिती कळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना दिली. त्यांच्या सूचनेने पोलिसांनी (Police) सापळा रचून संशयित दीपक जाधव यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दोन दुचाकी जप्त केल्या. तपासात सचिन मोरे याच्याकडे चोरीच्या चार दुचाकी मिळून आल्या. त्याने योगेश दाभाडे याच्याकडून दुचाकी खरेदी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police Station) २, म्हसरूळ, भद्रकाली, पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन, सटाणा पोलीस ठाणे प्रत्येकी एक असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आणले. पाथर्डीफाटा येथील मुंबई-आग्रा महामार्ग उड्डाणपुलाखाली विना नंबरप्लेट असलेल्या तीन दुचाकी बेवारसरित्या पार्क करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चेसीज व इंजिन नंबरवरून खात्री केली.

दरम्यान, त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) असल्याचे समोर आले. पोलिसांनी आठ गुन्हे उघडकीस आणून दोघांना अटक केले. सहायक निरीक्षक सचिन जाधव, उपनिरीक्षक प्रसाद रणदिवे, हवालदार गुलाब सोनार, सहायक उपनिरीक्षक श्रीराम सपकाळ, बाळू शेळके, हवालदार विजय वरंदळ, सुहास क्षिरसागर आदींनी ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या