Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : पतंगाच्या मांजामुळे नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : पतंगाच्या मांजामुळे नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू

नाशिक। प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

मकर संक्रातीचा उत्सव जानेवारी २०२५ मध्ये साजरा हाेणार आहे. तत्पूर्वीच लहानग्यांसह तरुणांनी आतापासूनच पंतगाेत्सव सुरु केला आहे. पण, वडाळागावात हाच पंतगाेत्सव नऊ वर्षीय बालकाच्या जीवावर बेतला आहे. खेळता खेळता पतंगाचा धारदार मांज्या विष्णू संगम जाेशी(रा. मारुती मंदिरासमाेर, माळीगल्ली) याच्या मांडीला चिरुन गेल्याने अतिरक्तस्त्राव हाेऊन त्याचा दुर्देवी मृत्यू ओढावला. ही घटना वडाळागावातील माळीगल्लीजवळ शुक्रवारी (दि. ८) सकाळी घडली असून परिसरावर शाेककळा पसरली आहे.

YouTube video player

ही घटना समजताच त्याला मावसभाऊ गणेश भदरगे याने तत्काळ मनपाच्या डाॅ. झाकिर हुसैन रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डाॅ. शगुफा यांनी तपासून मृत घाेषित केले. याबाबत इंदिरानगर पाेलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Crime News : बस स्थानकावर महिलेच्या पर्समधून 37 हजार लंपास

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील पुणे बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पर्समधील 37 हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली...