केरळ | Kerala
केरळच्या कोझिकोड (Kozikode) येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निपाह व्हायरसमुळे (Nipah Virus) हे मृत्यू झाले असावेत अशी शंका आरोग्य कर्मचारी उपस्थित करत आहेत. मृत झालेल्या दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. बुधवारपर्यंत त्याचे रिपोर्ट येतील अशी अपेक्षा आहे.
एका खासगी रुग्णालयात हे दोन्ही मृत्यू झाले आहेत. मृत झालेल्या दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. बुधवारपर्यंत त्याचे रिपोर्ट येतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून आरोग्य विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. याआधीही कोझिकोड येथे निपाहची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
आसाम भूकंपाने हादरले; दोन आठवड्यात २० धक्के
राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचे सांगण्यात आले. तसेच, निवेदनात म्हटले आहे की, ताप आल्यानंतर दोन लोकांचा ‘अनैसर्गिक’ मृत्यू झाल्याची सूचना एका खाजगी रुग्णालयातून मिळाली आहे आणि त्यांच्या मृत्यूचे कारण निपाह व्हायरस असल्याचा संशय आहे.
दरम्यान, २०१८ आणि २०२१ मध्ये कोझिकोड जिल्ह्यातही निपाह व्हायरसमुळे मृत्यूची नोंद झाली होती. दक्षिण भारतात निपाह व्हायरसचा पहिला रुग्ण १९ मे २०१८ रोजी कोझिकोड जिल्ह्यात आढळून आला होता.
IND vs SL Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये भारताचा आज लंकेशी सामना, जाणून घ्या संभाव्य प्लेइंग-11
निपाहची लागण कशी होते
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, निपाह व्हायरसचा संसर्ग हा प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणारा एक झुनोटिक रोग आहे आणि तो दूषित अन्नाद्वारे किंवा थेट एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. बाधित लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.
निपाह व्हायरसची लागण झालेले लोकांना श्वसनाचे आजार आणि घातक एन्सेफलायटीस यासह विविध प्रकारचे रोग पसरवू शकतात. याशिवाय, हा व्हायरस डुकरांसारख्या प्राण्यांमध्ये गंभीर आजाराचे कारण होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हटले आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) च्या शास्त्रज्ञांनी निपाह विषाणूसंदर्भात केलेल्या दुसऱ्या सेरो सर्वेक्षणात १० राज्यांत हा व्हायरस पसरत आहे.