Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमनिपाणी वडगावच्या इसमाची साडेसहा लाखांची फसवणूक

निपाणी वडगावच्या इसमाची साडेसहा लाखांची फसवणूक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गायींच्या व्यवहार प्रकरणी तालुक्यातील निपाणी वडगाव येथील एका इसमाची 6 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी अकलुज येथील दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राजेंद्र मापरे यांना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील अभिजीत उर्फ बंटी पवार, करण पवार यांनी फेसबुकवर टाकलेल्या गायी म्हैसी विक्रीचे फोटो पाहून मापारे यांच्याशी संपर्क केला. ते दि.10 ऑगस्ट 2024 रोजी निपाणीवडगाव येथे आले. त्यावेळी मापारे त्यांनी एकूण 5 गायींचा व्यवहार 4 लाख 60 हजार रुपयांमध्ये ठरविला.

- Advertisement -

त्यापैकी 2 लाख 10 हजार रुपये रोख देवून उर्वरीत 2 लाख 50 हजार रुपयांचा अ‍ॅक्सिस बँकेचा सह्या केलेला चेक मापारे यांना दिला. मापारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. तसेच पुन्हा दि. 19 सप्टेंबर 2024 रोजी 5 गायी खरेदीचा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा व्यवहार ठरवून गायी अकलुज येथे गाडीत भरून घेऊन येण्यास सांगितले. त्यावरुन मापारे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून अभिजीत पवार व करण पवार यांच्याकडे 5 गायी दिल्या. त्यावेळी त्यांनी फक्त 50 हजार रुपये रोख देऊन उर्वरीत 4 लाख रुपयांचे प्रत्येकी 1 लाख प्रमाणे युनियन बँकेचा चेक मापारे यांना दिला. त्यानंतर मापारे यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता त्यांनी पैसे खात्यावर नसल्याबाबत कारणे देवून दिशाभूल केली.

श्री. मापारे यांनी पवार यांनी दिलेले बँक चेक दि. 24 सप्टेंबर व 4 ऑक्टोबर 2024 रोजी वटविण्यासाठी बँकेत टाकले. परंतु नमुद खात्यावर पैसे शिल्लक नसल्याने ते बाऊन्स होवून परत आले. त्यावरून अभीजीत उर्फ बंटी अभिमान पवार, करण अभिमान पवार यांनी संगनमत करून श्री. मापारे यांची एकूण 6 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात राजेंद्र सोमनाथ मापरे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अभिजीत उर्फ बंटी अभिमान पवार, करण अभिमान पवार (दोन्ही रा.अकलुज) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या