Sunday, August 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशिवापूरच्या महालक्ष्मी मंदिरात चोरी; रोख रकमेसह ऐवज लंपास

शिवापूरच्या महालक्ष्मी मंदिरात चोरी; रोख रकमेसह ऐवज लंपास

शिरवाडे वाकद | प्रतिनिधी

- Advertisement -

निफाड तालुक्यातील शिवापूर (शेळकेवाडी) येथील श्री.महालक्ष्मी माता मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीच्या पादुका, पितळी समई तसेच दानपेटीतील रक्कम असा एकूण सुमारे ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

फिर्यादी दिनकर पंढरीनाथ जगताप यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमचे गावातील महिला राही भाऊसाहेब पवार या दर्शनासाठी गेल्या असता श्री.महालक्ष्मी माता मंदिरात दरवाजाचे कडी कोंयडा तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ मला कळवले. मी सोबत निलेश राजाराम जगताप, संदीप प्रकाश मोगल, दत्तु सुभाष जगताप, हेमंत बबन जगताप असे मंदिराकडे गेलो असता दानपेटीचे कडी कोयंडा तुटलेला दिसला तसेच श्री.महालक्ष्मी माता मंदिरात चिटकवलेल्या चांदीच्या पादुका दिसल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला मंदिरात चोरी झाल्याची खात्री झाल्याने पो.पा.मधुकर डोमाडे व गणेश जगताप यांना माहीती दिली.

प्रथमदर्शनी ४५ हजार रु.च्या अंदाजे अर्धा किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, ८ हजार रु.ची पितळी समई, ५ हजार रोख रुपये असा एकूण ५८ हजार रुपयांचा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.कॉ.नवनाथ नाईकवाडे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुल गांधी यांच्याकडून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कॉक्रोज जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छात्रो की गुंज असे उपक्रम हाती घेऊन राहुल गांधी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम करत आहेत....