Saturday, October 19, 2024
Homeनाशिकनिर्मल वारीचा प्रस्ताव आला 'इतक्या' कोटींवर

निर्मल वारीचा प्रस्ताव आला ‘इतक्या’ कोटींवर

नाशिक | प्रतिनिधी
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेला पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने फेटाळला आहे. या आराखड्यात वारकर्‍यांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी सव्वादोन कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने फेरसादर केला असून, त्याला सोमवारी मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत पायी दिंडी जाते. संत निवृत्तीनाथांच्या दिंडीला मानाचे स्थान असल्याने राज्य शासनाने गेल्या वर्षी ‘निर्मल वारी’तून त्यासाठी निधी देण्याची घोषणा केली. त्याआधारे जिल्हा परिषदेने पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवला. या आराखड्यात वॉटरप्रुफ मंडप, स्टेज, अग्निशमन सुविधा, पावसापासून सरंक्षणासाठी गोल मंडप, साऊंड सिस्टिम, जनरेटर, लाईट व्यवस्था, फिरते शौचालय, स्नानगृह, शासकीय कर्मचारी भोजन व्यवस्था, पालखीमध्ये समाविष्ट पशुधन खर्च, मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्राम पंचायतींना मुलभूत सुविधा देण्यासाठीही निधी तरतूद केलेली होती. सतरा बाबींचा समावेश असलेल्या पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव ग्राम विकास विभागाचे सचिव डवले यांनी फेटाळून लावला.

- Advertisement -

राज्यातील सर्व दिंड्यांना एकसमान सुविधा पुरवल्या जातील. यात फिरते शौचालये, स्नानगृह, पाण्याची व्यवस्था सरकारमार्फत पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुलभूत सुविधांचा समावेश असलेला नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेने दोन कोटी २४ लाख ६६ हजारांचा प्रस्ताव गुरुवारी (ता.१३) ग्राम विकास विभागाकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर येथून येत्या २० तारखेला दिंडीचे पंढरपुरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या