दिल्ली | Delhi
दृश्यम् Drishyam चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत Nishikant Kamat यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अभिनेता रितेश देशमुख Ritesh Deshmukk यांनी दिली आहे. त्यांच्या मृत्यूबाबतची अफवा पसरली होती.
- Advertisement -
रितेश देशमुख यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “निशिकांत कामात हे व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”
तसेच सत्यमेव जयते चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवरी यांनी देखील ट्विट करत निशिकांत कामात यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
तसेच रुग्णालयाने दुपारी एकच्या सुमारास निशिकांत कामत यांच्या प्रकृतीसंदर्भात मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. निशिकांत कामत सध्या व्हेंटिलेटवर असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.