मुंबई | Mumbai
नागपूरमधील हिंसाचाराचे राजकीय पडसाद उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल निवेदन केल्यानंतर कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनीही भाष्य केले. आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही. हे पूर्वनियोजित होते, असा वास येतोय, असे ते म्हणाले. माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? चिंता करायची नाही, अशी प्रतिक्रिया नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याच्या वृत्तावर दिलीय.
राज्यात औरंगजेबच्या कबरीचा वाद पेटला असून नागपुरात दंगल भडकली आहे. याला नितेश राणे यांच्या भडकाऊ विधान जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. त्यावरून आज मुख्यमंत्री फडणवीसांनी राणेंना तंबी दिली असल्याचे सांगितले जातेय.
येत्या गुरुवारी मी जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे स्वाभाविकच या कार्यक्रमाचे पाहिले आमंत्रण मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देईल. मत्स्य खात्याचा मंत्री असल्याने माझी निमंत्रण पत्रिका देखील माशाच्या आकाराची आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे. ‘माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार? चिंता करायची नाही, मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या प्याद्या मधला मी एक आहे. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांची एक यादी आहे त्यामध्ये नितेश राणेंचं नाव आहे. त्यामुळे कुणाला चिंता करण्याची गरज नाही. अशी स्पष्टोक्ती ही मंत्री नितेश राणे यांनी दिली.
नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर हल्ला करणे हे कुठल्या संविधानात लिहिलेय? असा सवाल करत मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितल्याप्रमाणे आता प्रश्न उद्भवला आहे की, मुळात ट्राली भरून दगडी आल्या कुठून? त्यामुळे आता पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कशी कारवाई होते ते बघाच, असेही नितेश राणे म्हणाले.
“या सगळ्या घटना बघितल्यावर हे सगळं पूर्वनियोजित होते, असा वास येतोय. काही गोष्टी ठरवून केलेल्या होत्या. इथे दंगल घडवायचीच आहे, अशी काही लोकांची तयारी होती का? त्याबद्दल चौकशी होणार. तुम्ही या राज्यात तुम्ही काहीही घडवणे आता सोप्पे राहिलेले नाहीये. पोलीस शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी होते, त्यांच्यावर हल्ला करण्याचे कारण काय? कुऱ्हाडीने हल्ला केला”, असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला.
“हल्ला केल्यावर आम्ही सरकार म्हणून गप्प बसणार नाही. पाकिस्तानचा अब्बा आठवेल, अशी कारवाई आता होणार आहे. आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे. पण, हे आंदोलन कुठल्या प्रकारचे? ही हिंमत तोंडण्याचे काम आमचे देवाभाऊचे सरकार करेल”, असे नितेश राणे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा