मुंबई | Mumbai
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितले की, या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा शारीरिक हल्ल्याचा कोणताही पुरावा नाही आणि ही आत्महत्या असल्याचे दिसते. मुंबई पोलिसांनी त्यांना क्लीन चिट दिली आहे. त्यानंतर, भाजप नेते आणि विद्यमान मंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होणार्या आरोपासंदर्भाने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी, असेही म्हटले होते. आता, नितेश राणेंनी याबाबत भूमिका व्यक्त केली आहे.
“कोर्टात चालू असलेला मॅटर आहे. त्याबद्दल किती भाष्य करु शकतो, यावर प्रश्नचिन्ह आहे. हा नितेश राणेंचा विषय नाही. राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियानचे वडील ज्यांनी स्वतची मुलगी गमावली ते राजकीय आरोप करणार आहेत का? ते मुद्दामून कोणाचे नाव घेणार का? त्यांनी जे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले, दिशा सालियानच्या वडिलांनी डिनो मारियो, आदित्य ठाकरे यांची नाव घेतली आहेत. म्हणून मी एवढच सांगेन पिक्चर अजून बाकी आहे. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. १६ तारीख दिली आहे. त्या तारखेला काय होत ते आपण बघू. ” असे नितेश राणे म्हणाले.
राज्य सरकार आणि आताचे पोलीस त्यांना जे दिसले, तो अहवाल त्यांनी दिला. ज्यावेळी एसआयटी गठीत झाली, त्यावेळी दिशा सालियान प्रकरणात त्यातील एक आरोपी साथीदार आहे आणि त्याला बदलण्यात यावे म्हणून पत्र दिलेले आहे.
आगे आगे देखो होता हैं क्या…
या प्रकरणात माननीय कोर्ट निर्णय देईल. या प्रकरणात १६ तारखेला काय होते हे पाहूयात. नितेश राणे पुढे म्हणाले की, कोर्टात आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दिले आहे, त्यामध्ये त्यांनी मी स्वत: आमदार असल्याचे लपवले आहे. आता उत्तर देण्यापेक्षा आगे, आगे देखो होता हैं क्या, तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन ठेवा. नंतर एकत्र वाजवायला मिळतील, असेही राणेंनी म्हटले. मुंबई पोलिसांनी दिशा सालियानच्या मृत्यूला सुरुवातीला आत्महत्या म्हटले होते आणि मार्च २०२१ मध्ये पोलिसांनी अंतिम अहवालात याला अपघात म्हटले होते. दिशाचे वडील सतीश सालियान यांनी २०२५ मध्ये बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची आणि शिवसेना (उबाठा गट) नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.
दरम्यान, कोर्टात आदित्य ठाकरेंनी खोटी माहिती दिली, मी आमदार आहे हे लपवून त्यांनी आपण व्यवसाय करत असल्याचे दाखवले. दिशा सालियानला नक्की न्याय दिला जाणार हे सर्व आरोपी तुरुंगात जाणार, असेही नितेश राणेंनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




