सिंधुदूर्ग | Sindhudurga
शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी काल (२६ नोव्हेंबर) थेट मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी धाड टाकली. निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत विजय किनवडेकर यांच्या राहत्या घरी अवैध आणि हिशोबी नसलेली मोठी रोख रक्कम आढळून आली. यावरून राणे बंधूंमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केनवडेकर यांच्या घरी भेट देऊन “हमाम मैं सब नंगे है, जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागणार,” असे म्हणत सूचक इशाराच दिला आहे.
स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय?
आम्ही सगळे जण राजकीय पक्षाचे सदस्य आहोत, आमचे व्यवसाय असतात. राजकारण समाजकारण करून पक्षाचे काम करतो कारण आम्हाला पक्षाची विचारधारा आवडते. देशासाठी, राज्यासाठी काम करायचे असतात. पण हे काम करत असताना पोटापाण्यासाठी उद्योग व्यवसाय करावे लागतात. “आमचे स्वतःचे व्यवसाय पण असतात. स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर त्यात चूक काय? आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये. प्रत्येकाचे व्यवसाय आहेत. जो नियम आम्हाला लागतो तो नियम सगळ्यांना लागेल.
हमाम मैं सब नंगे है
पुढे नितेश राणे म्हणाले की, “रविंद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात जावे लागते. उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाणा घातला तर?” असे म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला. हमाम मैं सब नंगे है,” असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. या घटनेनंतर आता कोकणात नितेश राणे आणि निलेश राणे या बंधूंमधील वाद हा चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे.
आम्ही विकासावर बोलतोय, त्यावरच मत मागतोय
भाजपला अशा पद्धतीने निवडणूक लढविण्याची काही गरज नाही, मोदी फडणवीस यांचे नेतृत्व असताना आम्हाला असे करण्याची गरजच काय? आम्ही विकासावर बोलतोय, त्यावरच मते मागतोय. निवडणूक आयोग आणि पोलीस चौकशीत उलगडा होईल, असे नितेश राणे म्हणाले.
युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेली
रवींद्र चव्हाण यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेलं नाहीय. आम्हाला युती करायची होती, तुम्ही का केली नाही?, तुम्ही साधा फोनही उचलला नाही, असं निलेश राणे म्हणाले. भाजपचे पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या पगारावर आहेत, असंही निलेश राणेंनी सांगितले. यावर देखील नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपची पद्धत आहे, केव्हातरी तुम्ही समजून घ्या…प्रक्रियेचा भाग असतो. स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच मत घेऊन तो प्रस्ताव प्रदेशाकडे पाठवला जातो. आता युतीची चर्चा करण्याची वेळ निघून गेलीय, असंही नितेश राणे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




