Saturday, May 18, 2024
Homeनाशिकहिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मियांनी कायद्याचे आदेश पाळावे - नितेश राणे

हिंदू धर्माप्रमाणेच इतर धर्मियांनी कायद्याचे आदेश पाळावे – नितेश राणे

नाशिकरोड | प्रतिनिधी | NashikRoad

कायदे फक्त हिंदू धर्मालाच आहे का? इतरांना नाही का? ज्याप्रमाणे हिंदूधर्म कायद्याचे आदेश पाळतो त्याप्रमाणे इतर धर्मियांनी सुद्धा पाळावे व कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी केले आहे. येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या (Sane Guruji Shikshan Prasarak Mandal) वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत अनेक विषयांवर भाष्य केले…

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे. मात्र, त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात, कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे. अन्यथा आम्हाला जनआंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार राणे यांनी दिले.

राणे पुढे म्हणाले की, सभागृहात मी भद्रकालीचा (Bhadrakali) विषय घेतला. त्याठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात (Nashik City) मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अतिक्रमणाबाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसले आहे त्यांच्याबाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

तसेच नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला. मी विधिमंडळाचा सदस्य असल्याने महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो. माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तानमध्ये नाही. मराठा समाजाला आरक्षण (Reservation) देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे. मात्र, इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल, असेही राणेंनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या