Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनकंगना तो एक बहाना है!

कंगना तो एक बहाना है!

मुंबई | Mumbai –

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने मुंबईविरोधात केलेल्या विधानामुळे शाब्दीक युद्ध रंगले आहे. राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टीतूनही या प्रकरणावर

- Advertisement -

अनेक लोक बोलत आहेत. त्यात आता कणकणवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी एक सूचक ट्विट केलंय. कंगना एक बहाना आहे, असं ते म्हणाले आहेत.

नितेश राणे यांनी शायरीच्या अंदाजात ट्विट करुन निशाणा साधला आहे. कंगना तर फक्त एक कारण आहे. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियानच्या प्रकरणावरुन लक्ष हटवायचे आहे. बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे. त्यापेक्षा जास्त काही नाही असे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या संपूर्ण वादात खासकरुन शिवसेना नेत्यांकडून कंगनाला लक्ष्य केले जात आहे. संजय राऊत यांनी कंगनाला सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे असती तर आमच्या रणरागिणी तिचे थोडाब फोडल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणार्‍या कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

जीएसटी संकलनात मोठी वाढ

0
नवी दिल्ली ।प्रतिनिधी New Delhi मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन ९.९% वाढून १.९६ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले, जे आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन...