दिल्ली | Delhi
देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मोनिंदर पंढेर या दोन आरोपींची फाशीची शिक्षा अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली.
यापूर्वी गाजियबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले होते. न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्र आणि न्यायमूर्ती एसएचए रिझवी यांच्या खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करत निकाल राखून ठेवला होता. सोमवारी खंडपीठाने अंतिम निकाल देताना सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
भारताच्या इतिहासातील आलिकडच्या काळातील निठारी हत्याकांड प्रकरण हे खूपच भयानक असं गुन्हेगारी प्रकरण आहे. यामध्ये सुरिंदर कोळी याच्यावर आरोप आहे की, अमानुषपणे बालकांना ठार करत त्यांचं मृत शरीराचे करवतीनं कापून त्याचे तुकडे नोयडातील निठारी इथं मोनिंदर सिंह पंढेर याच्या घराच्या आवारात पुरले होते. सन २००६ मध्ये समोर आलेल्या या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती.