Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याNitin Desai Funeral : जिथे घालवले अखेरचे क्षण, त्याच ठिकाणी नितीन देसाई...

Nitin Desai Funeral : जिथे घालवले अखेरचे क्षण, त्याच ठिकाणी नितीन देसाई यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

मुंबई । Mumbai

मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांच्या भव्यदिव्य देखाव्यांनी सजलेल्या ज्या एनडी स्टुडिओच्या उभारणीत अनेक वर्षे घालवली, त्याच स्टुडिओतील मध्यभागी असलेल्या मंचावर कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. एनडी स्टुडिओमध्ये आज नितीन देसाईंना देणार अखेरचा निरोप देण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

- Advertisement -

सध्या नितीन यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर मुंबईतील जेजे रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे. अजूनही कुटुंबातील काही सदस्यांची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार , मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशीष शेलार यांनी जेजे रुग्णालयात देसाई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. यावेळी अजित पवार यांनी देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितले.

Nitin Desai Suicide: नितीन देसाईंनी का उचललं टोकाचं पाऊल? स्थानिक आमदार म्हणाले, “दीड महिन्यांपूर्वीच…”

नितीन देसाईंच्या आत्महत्येचा तपास करणाऱ्या रायगड पोलिसांना देसाई यांच्या कार्यालयात सापडलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये ११ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत. यापैकी एका क्लिपमध्ये त्यांनी पाऊले चालती पंढरीची वाट असे म्हटले आहे. देसाई यांच्याकडून जास्त व्याज आकारण्यात आले होते की नाही याची चौकशी करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.

ND Studio बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता!

कलाकारांना आणि नवोदित प्रतिभेला व्यासपीठ देण्यासाठी कर्जत स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, असे देसाई यांनी क्लिपमध्ये आवाहन केले आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार देसाई मध्यरात्री दिल्लीहून मुंबई विमानतळावर उतरले. बुधवारी पहाटे २ च्या सुमारास कर्जत येथील ६० किमी दूर असलेल्या त्यांच्या स्टुडिओत पोहोचले. त्यांनी स्टुडिओच्या आवारातील मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्याच्या सेवकाला स्टुडिओभोवती फेरफटका मारण्यासाठी सोबत येण्यास सांगितले. त्यांनी अटेंडंटला मेगा फ्लोअरची चावी आणण्यास सांगितले. त्यावेळी मेगा फ्लोअरवर मध्यवर्ती स्टेजच्या मध्यभागी दोरी अडकविली.

देसाई यांनी महिनाभरापूर्वीच जीवन संपवण्याचा प्लॅन आखला होता, असा पोलिसांचा संशय आहे. तशी दोरी का लटकविली आहे, असे विचारले तेव्हा त्यांनी ते वास्तुशास्त्रानुसार असल्याचे कर्मचाऱ्यांना सांगितले. देसाई यांनी पहाटे ४ ते ६ या वेळेत आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी स्टेजच्या फरशीवर दोरीवरून धनुष्यबाणाची डिझाईन बनविली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या