Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशNitin Gadkari: लोकसभेत बोलताना नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले, "मला तोंड...

Nitin Gadkari: लोकसभेत बोलताना नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “मला तोंड लपवावे लागते”…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भाजपाचे नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्ट आणि परखड स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी पुन्हा एकदा आपले स्पष्ट आणि परखड मत मांडले आहे. गुरुवारी लोकसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, “रस्ते दुर्घटनेसंबंधी भारताचा रेकॉर्ड इतका वाईट आहे की जागतिक परिषदेत आपले तोंड लपवावे लागते”. नुकतेच त्यांनी रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूबाबत लोकसभेत भूमिका मांडली.

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांची उत्तरं देताना केंद्रीय नितीन गडकरी यांनी भारतात होणाऱ्या अपघातांबद्दल भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारतात रस्ते अपघातात मोठी वाढ झाली असून यात बदल घडविण्यासाठी मानवी स्वभावात बदल होणे आवश्यक आहे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी जेव्हा पहिल्यांदा या खात्याचा पदभार स्वीकारला होता. तेव्हा रस्ते अपघातात ५० टक्के घट करण्याचे ध्येय ठेवले होते. पण अपघात कमी होणे दूरच राहिले, तर त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली, अशी कबुलीच गडकरी यांनी दिली. त्यामुळेच मी जेव्हा आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होतो, तेव्हा रस्ते अपघाताचा विषय निघाल्यानंतर मला तोंड लपवावे लागते, असे ते म्हणाले. “दुर्दैवाने आपल्या देशात रस्ते अपघाताची संख्या वाढत आहे. 4 लाख 80 हजार 583 अपघात झाले असून मृतांची संख्या 1.5 लाखावरुन 1 लाख 72 हजार 890 झाली आहे,” अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, “इतके लोक ना लढाईत मरतात, ना कोविडमध्ये, ना दंगलीत मरतात. मी जागतिक परिषदेत गेल्यानंतर तोंड लपवतो. (दुर्घटनांमध्ये) सर्वात खराब रेकॉर्ड आपलाच आहे”. रस्ते अपघात रोखण्यासाठी खासदारांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करावेत आणि परिवहन विभागाच्या मदतीने शाळा इत्यादींमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत, असेही त्यांनी सुचवले आहे.

पुढे ते म्हणाले, अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल. भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती गडकरी यांनी दिली.

नीति आयोगाच्या अहवालानुसार रस्ते अपघातातील ३० टक्के लोक अपघातानंतर लगेच जीव वाचवू शकणारे उपचार न मिळाल्याने मृत्यूमुखी पडतात असे नितीन गडकरींनी सांगितले. ते म्हणाले, “त्यामुळे उपचारांसाठी कॅशलेस योजना आणली आहे. हा पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला असून, त्यानंतर तो संपूर्ण देशात लागू केला जाईल”.

कोणत्या राज्यात सर्वाधिक अपघात?
उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. एकूण अपघातांपैकी १३.७ टक्के म्हणजे २३,००० मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशमध्ये झाले. त्यानंतर तमिळनाडूमध्ये १०.६ टक्के म्हणजे १८,००० मृत्यू झाले. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र असून ९ टक्के म्हणजेच १५,००० मृत्यू झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. त्यानंतर चौथ्या क्रमाकांवर मध्य प्रदेशमध्ये १३,००० मृत्यू झाले आहेत. शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्वाधिक मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत वर्षाला १,४०० मृत्यू झाले असून त्याखालोखाल बंगळुरूचा (९१५) क्रमांक लागतो.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...