Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर

मुंबई | Mumbai

नितीन गडकरी (Nitin Gadkari) देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ (Highway Man Of India) अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

- Advertisement -

नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

ज्या लोकांनी मृतदेह ठेवायच्या पिशव्यांच्या व्यवहारात…; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर खरमरीत टिका

‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोण पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली असून लवकरच याचा खुलासा होणार आहे. या चित्रपटाचे स्क्रिनींग स्वतः नितीन गडकरींनी बघितले आहे. त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यावरच हा चित्रपट पुढे सेन्सॉरच्या दिशेने सरकला आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’ नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक.

NCP Crisis : शरद पवार गटाची मोठी खेळी! अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ २७ ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या