Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशनितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली | New Delhi
लोकसभा निवडणुकीच्या निकालात बिहारमध्ये ४० पैकी ३० जागा एनडीएने जिंकल्या आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूला १२ जागा जिंकता आल्या आहेत. एनडीएने २९२ जागा तर इंडिया आघाडीला २३१ जागा मिळाल्या आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर नितीश कुमार एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. बिहारचे विरोधी पक्षनेते असलेले तेजस्वी यादव यांच्यासोबत मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच विमानाने दिल्लीला गेले. त्यांचा विमानातील फोटोही समोर आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

देशातील दोन्ही आघाड्यांनी सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली वेगवान केल्या आहे. त्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून आज दिल्लीत बैठकांचे आयोजन केले आहे. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना किंगमेकर होण्याची संधी असल्याने त्यांच्या भुमिकेकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. याचदरम्यान, बिहारमधून नितीश कुमार हे एनडीएच्या बैठकीसाठी विमानातून निघाले. त्याचवेळी तेजस्वी यादव देखील त्याच विमानातून दिल्लीला निघाले. यामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisement -

यावेळी नितीश कुमार म्हणाले की, राष्ट्रीय जनता दलाला सर्वाधिक मतं मिळाली आहे, सर्वाधिक मतांची टक्केवारी ही आमची आहे. जागांमध्येही वाढ झाली आहे. भाजपकडे स्वत:चे बहुमत नाही. भाजपला आता अवलंबून रहावं लागणार आहे. बिहार किंगमेकर म्हणून पुढे येत असून यामध्ये नितीश कुमारांचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. तसेच बिहारच्या राजकारणात ही बऱ्याच घडामोडी घडत आहे. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर नितीश कुमार यांच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. एनडीए आणि इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. नितीश कुमार आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव दिल्लीला रवाना झाले. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र दिसले.

दरम्यान, इंडिया आघाडीचे नेते अखिलेश यादव यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अखिलेश यादव आज चंद्रबाबू नायडू यांना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या