Friday, April 25, 2025
Homeक्रीडाNitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाला धु धु धुतलं! झळकावलं...

Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियाला धु धु धुतलं! झळकावलं कसोटीतलं पाहिलं शतक

मेलबर्न । Melbourne

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) कसोटी मालिका सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे.

- Advertisement -

चौथ्या कसोटीचे नाणेफेक हे ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव आपल्या नावावर केला आणि ४७४ धावा केल्या. भारत पहिल्या डावात सुरुवातीला पूर्णपणे अपयशी ठरला पण नितीश कुमार रेड्डीने आणि वाॅशिंग्टन सुंदरने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. नितीश कुमार रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.

नितीश कुमार रेड्डीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक मेलबर्न कसोटीत झळकावले आहे. नितीशचे अर्धशतक अशा वेळी आले जेव्हा टीम इंडिया फॉलोऑन वाचवण्याची धडपड होती. नितीशनेने १७२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि या शानदार खेळीत १० चौकार आणि एक षटकारही लगावला. नितीश रेड्डी आता ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा तिसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. नितीश यांनी वयाच्या २१ वर्षे २१६ दिवसात ही कामगिरी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...