पाटणा | Patna
बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर, आज (दि.20) पाटण्यातील गांधी मैदानावर नवीन सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. यात नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शपथ घेतली.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी १० व्यांदा शपथ घेऊन सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री बनण्याचा नवा विक्रम रचला आहे. तर, त्यांच्यासोबत भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांनी दुसऱ्यांदा उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज एकूण २६ मंत्र्यांना राज्यपालांनी गोपनीयतेची शपथ दिली. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात मोठ्या जनसमुदायासमोर हा शपथविधी संपन्न झाला.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूने प्रत्येकी १०२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी, भाजपने ८९ तर जेडीयूने ८५ जागांवर विजय मिळवला. तर, चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाला १९ जागा जिंकता आल्याने २०२ जागांसह मोठे बहुमत एनडीए आघाडीला मिळाले. त्यानंतर आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनी १० व्यांदा शपथ घेतली. यावेळी नितीश कुमारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याजवळ जाऊन अभिनंदन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी “जय बिहार” आणि “नितीश कुमार झिंदाबाद” अशा घोषणा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या. यावेळी समर्थकांनी नेत्यांचे स्वागत करण्यासाठी हवेत गमछे फडकावले.
नितीश कुमार यांच्यासह या मंत्र्यांनी घेतली शपथ
सम्राट चौधरी
विजय कुमार सिन्हा
विजय कुमार चौधरी
बिजेंद्र प्रसाद यादव
श्रवण कुमार
मंगल पांडेय
डॉक्टर दिलीप जायसवाल
अशोक चौधरी
लेसी सिंह
मदन सहनी
नितिन नवीन
रामकृपाल यादव
संतोष कुमार सुमन
सुनील कुमार
मो. जमा खान
संजय सिंह टाइगर
अरुण शंकर प्रसाद
सुरेंद्र मेहता
नारायण प्रसाद
रमा निषाद
लखेंद्र कुमार रोशन
श्रेयसी सिंह
डॉ. प्रमोद कुमार
संजय कुमार
संजय कुमार सिंह
दीपक प्रकाश
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




