Saturday, November 23, 2024
Homeक्रीडापॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितीश कुमारचा 'गोल्डनस्मॅश'; बॅडमिंटनमध्ये पटकावले सुवर्णपदक

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नितीश कुमारचा ‘गोल्डनस्मॅश’; बॅडमिंटनमध्ये पटकावले सुवर्णपदक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरूच आहे. सोमवारी बॅडमिंटनपटू नितीश कुमारने पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. बॅडमिंटन एकेरीमध्ये ब्रिटेनच्या बेथलचे यावेळी नितेशपुढे आव्हान होते. अंतिम सामन्यात नितेशने बेथलचा २१-१४, १८-२१, २३-२१ असा पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.

नितीशकुमारने पहिल्या सेटमध्ये दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याला टिकून राहण्याची फार संधी दिली नाही. भारतीय खेळाडू नितीश कुमार विरुद्ध डॅनियल बेथेल फ्लॉप ठरला. नितीशने उत्कृष्ट कामगिरी करत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. सुरुवातीपासूनच त्याने आघाडी कायम ठेवली आहे. याच कारणामुळे त्याने हा सेट २१-१४ असा जिंकला.

- Advertisement -

दुसऱ्या सेटमध्ये परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत होती. या सेटमध्ये ग्रेट ब्रिटनचा डॅनियल बेथेल खूपच आक्रमक दिसत होता. या सेटमध्ये नितेश थोडा मागे राहिला. शेवटी, बेथेलने हा सेट २१-१८ असा जिंकला. दुसरा सेट जिंकताच त्याने सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये नितीशकुमारने पुनरागमन करत हा सेट २३-२१ असा जिंकला. सेट जिंकण्याबरोबरच त्याने सुवर्णपदकही पटकावले.

पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे एकूण नववे तर दुसरे पदक ठरले आहे. नितेशच्या आधी महिला नेमबाज अवनी लेखराही सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरली होती. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा नितेश हा दुसरा भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे. प्रमोद भगतने टोकियो येथे पॅरा बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या