नाशिक | फारुक पठाण
नगरपालिका ते महापालिकेचा प्रवास पाहणाऱ्या मेन रोड येथील (Mainroad) महापालिका इमारतची (Mahapalika Building) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ब्रिटिश कालीन इमारत सध्या धोकादायक स्थितीत आली असून प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या महासभेत (Mahasabha) बीओटी तत्त्वावर विभागिय कार्यालय बांधण्याच्या (Divisional Office) कामाला मंजुरी मिळाल्याने पूर्व विभाग कार्यालय लवकरच द्वारका (Dwarka) येथील प्रशस्त जागेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगरपालिका तसेच 1992 साली झालेल्या महापालिका या सर्व घटनांची साक्षीदार असलेल्या मेन रोड येथील जुनी महापालिका इमारतीची सध्या अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी कशाबशा पद्धतीने काम सुरू होते, तसे पाहिले गेले तर सर्वात पहिले विभागीय कार्यालय जुने नाशिक म्हणजे पूर्व विभागाचे झाले पाहिजे होते. मात्र शहरातील इतर विभागीय कार्यालय झाले तर पूर्व विभाग कार्यालय त्या जुन्या इमारतीत चालू होते. 2019 झालेल्या जोरदार पावसाय या इमारतीची मोठी दुरवस्था झाली.
महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपुर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. या वास्तूला दगडी इमारत म्हणूनही ओळखले जाते. महापालिकेचे सुरूवातीला हे मुख्यालय होते. त्यानंतर पुर्व विभागाचे कार्यालय झाले.
इमारतीच्या देखभालदुरूस्तीबाबत प्रशासनाने कधीही विशेष असे लक्ष दिले नाही. दगडी इमारतीत पक्ष्यांच्या विष्ठेतून रोपे उगवून त्यांची वाढदेखील चांगलीच झाली; मात्र ती रोपे काढण्याबाबतही महापालिकेने कधी पुढाकार घेतला नाही.
नाशिक महापालिकेची सुमारे साडेपाच एकर जागा द्वारका चौफुलीच्या बाजूला पडून आहे. याठिकाणी काही विक्रेत्यांनी अतिक्रमण केले असून बाकी जागा रिकामी आहे, तर तीकडे वैद्यकीय कार्यालय देखील आहे, मात्र पूर्व विभाग कार्यालय या ठिकाणी करण्यासाठी अनेक अडचणी होत्या.
नुकत्याच झालेल्या महासभेत अडचणी दूर झाल्यामुळे लवकरच या ठिकाणी प्रशस्त असा विभागीय कार्यालय करण्यात यावा व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.