Wednesday, May 22, 2024
HomeनाशिकNashik News : मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांची काँग्रेस कमिटीत धडक

Nashik News : मनपा घंटागाडी कर्मचाऱ्यांची काँग्रेस कमिटीत धडक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या (NMC) पूर्व विभागातीळ कचरा उचलत नसल्याने घंटागाडी ठेकेदाराचा ठेका रद्द करावा, अशी मागणी नाशिक शहर व जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे नाशिक शहर अध्यक्ष हनिफ बशिर शेख यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

- Advertisement -

या मागणी बरोबरच त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांबद्दल अपशब्द वापरल्याने या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी काँग्रेस भवनवर सोमवारी (दि.१७) धडक मारत आक्रमक होत जाब विचारला. बशीर यांच्या या आड मुठेपणामुळे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्यावर सफाई कर्मचाऱ्यांची माफी मागण्याची वेळ आली.

Nashik News : जिल्हा उपनिबंधक सतीश खरेंना जामीन मंजूर

मनपाच्या पूर्व विभागात घंटागाडी ठेकेदाराकडून नागरिकांचा कचरा न उचलता परिसरातील हॉटेल व प्रायव्हेट हॉस्पीटलचा कचरा उचलला जातो. घंटागाडीवरील कर्मचारी नागरिकांशी हुज्जत घालून अपशब्द वापरतात. त्यामुळे या ठेकेदाराचा ठेका रद्द करावा,अशी मागणी बशीर यांनी मनपाकडे केली होती.

बशीर यांनी सफाई कर्मचाऱ्यांबद्दल वापरलेल्या अपशब्दाचा संताप झाल्याने या विरोधात आक्रमक होत कर्मचाऱ्यांनी संघटनेचे नेते महादेव खुळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेस कमिटीवर सोमवारी (दि.१७) धाव घेत याबाबत जाब विचारला. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेवक राहुल दिवे, नाशिक जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते.

Monsoon Session : पहिल्या दिवशी ४१ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

यावेळी बोलताना खुळे यांनी सांगितले की, घंटागाडी कर्मचारी हप्ते घेतात, रस्त्यावर कचरा हा तसाच राहात आहे. नागरीकांनी जाब विचारला तर ते नागरीकांना धमक्या देतात. व सांगतात की, तुम्ही कोणाकडे ही जा आमचे काही होत नाही. आरोग्य अधिकारी हे आमचे आहेत, असे सांगुन सफाई कर्मचारी धमक्या देतात.असे विविध आरोप बशीर यांनी केल्याचे खुळे यांनी सांगितले.

Ncp Crisis : अजित पवार गट आणि शरद पवारांमधील भेटीत कुठल्या विषयावर चर्चा झाली? समोर आली ‘ही’ मोठी माहिती

यावर राहुल दिवे यांनी कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला व यापुढे असे काही होणार नाही, असे आश्वासन दिले. शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी देखील कर्मचाऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मनपामध्ये सफाई कर्मचारी कायम करण्यासाठी काँग्रेसनेच व माजी आमदार स्व. जयप्रकाश छाजेड यांनी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र,सत्ता बदल झाल्याने कर्मचारी सेवेत कायम झालेले नाही. असे सांगत बशीर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आपण त्यांची माफी मागतो, असे छाजेड यांनी सांगितले. त्यानंतर हा वाद मितल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या