Saturday, July 27, 2024
Homeनाशिक‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’; तीन पंपांवर कारवाई

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’; तीन पंपांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पोलीस आयुक्त दीपक पांडेय Police Commissioner Deepak Pandey यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल No helmet, no petrol या मोहिमेकडे बघितले जात आहे. या मोहिमेला जे पेट्रोलपंपधारक गालबोट लावत आहेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत पंचवटी पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे.

- Advertisement -

पंचवटीतील तीन पेट्रोल पंपावर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’चे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. पंचवटी पोलिसांनी याबाबत गांधी, पालीजा आणी खालसा या तीन पेट्रोलपंपांना कारणे दाखवा नोटीस बजावत तुमचे ना हरकत प्रमाणपत्र का रद्द करू नये, असा जाब विचारला आहे.

या कारवाईने ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’चे उल्लंघन करणार्‍या शहरातील इतर पेट्रोलपंप चालकांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरात ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ ही मोहीम सुरू केली आहे.

वाहनचालकांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांना पेट्रोल दिले जाऊ नये, अशी सक्त ताकीद आहे. मात्र, अनेक पेट्रोलपंप चालक हा नियम धाब्यावर ठेवत आहे. अखेर या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अ‍ॅक्शन घेतली असून त्यांच्या हद्दितील तीन पेट्रोल पंपांवर धडक कारवाई करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या